मी देखील निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे कुलकर्णींनी सांगितलेली सर्व प्रक्रिया अगदी जवळून पाहिली आहे. खरेच येथे असाच सर्व धुमाकूळ असतो.
आम्हाला सांगण्यात आले होते की, कोणाही छायाचित्रकाराला फिरकू देऊ नका. मात्र आपण दुसरे दिवशी 'अमुक-अमुक नेता मतदान करताना'चा फोटो पाहतोच! हे कसे, हे कोडे उलगडले नाही.
मतदानात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मतदान केंदात मतदान करता येत नाही. त्यासठी स्वतंत्र टपाल मतदानाची व्यवस्था असते. पण बहुसंख्य कर्मचारी त्याचा लाभ उठवत नाहीत. मी मात्र तो आग्रह धाला. त्या साठी अक्षरशः सतराशे साठ उठाबशा काढाव्या लागल्या. पण मतदान हट्टाने केले. एवढा आग्रह कोण धरणार? ते सहज करणे शक्य व्हायला हवे.