काही वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर ( तेंव्हा सह्याद्री नव्हती बहुतेक, डीडी-१० असावी) बोक्या सातबंडे ही मालिका लागत असे. त्याचे काही भाग पाहिल्याचे आठवते. बोक्या सातबंडे हे नावच खूप आवडले होते. बोक्याची पुस्तकेही आहेत हा शोध खूपच उशिरा लागला. दिलीप प्रभावळकरांची कागदी बाण, गुगली, अनुदिनी वगरे इतर पुस्तके वाचलेली असल्यामुळे बोक्याही अतिशय रंजक असणार असे वाटत होतेच.
आता बोक्याला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल. ही बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
--अदिती