माझ्या मते, आकर्षण हे व्यक्तिसापेक्ष नसते. तसे असते तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना (फक्त फरक दाखवण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सामान्य असे म्हणत आहे) आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिशिवाय कुणाचेही आकर्षण वाटलेच नसते.
अजून थोडे स्पष्ट करायचे तर, (खाली घेतलेली उदाहरणे समलिंगी नसणाऱ्यांची आहेत. )
१) मला (स्त्री किंवा पुरुष) अमुक एक व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) आवडते पण तिला/ त्याला मी आवडत नाही तर मी तिथेच थांबतो/ते का? तू नहीं तो और सही ह्या न्यायाने पुढे चालू पडतो. मग नंतर पदरात पडलेल्या व्यक्तिकडून समाधान मिळतच नाही असे काही नाही.
किंवा
२) मुलामुलींचे एकमेकांवर प्रेम आहे मात्र सामाजिक बंधनांमुळे ते एकत्र येऊ शकले नाहीत तर जीवनात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तिबरोबर समाधानकारक आयुष्य जगताच येत नाही का?
दोन्ही उदाहरणांत आवडणारी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असणे एव्हढेच महत्त्वाचे असते.
तेच समलिंगींच्या बाबतीतही असेल. सध्या समलिंगींची संख्या कमी असल्यामुळे काही समलिंगींना तडजोड करावी लागत असेल.