जर समलिंगी संभोग 'लादलेला' नसेल तर तो अस्तित्वात असण्याचे एक कारण माझ्यामते असे असावे.

 ऑपोझिट सेक्स च्या व्यक्तीबद्दल शारिरीक आकर्षण न राहणे - यात तिटकारा, कोंडमारा वगैरे कारणे असावीत. यात थोड्या जास्त प्रमाणात स्त्रिया असाव्यात असे वाटते कारण त्यांच्या नशीबातील समाजमान्य पुरुष जी वागणूक प्रदर्शित करत असतील त्यामुळे त्या नात्यातून त्या स्त्रिया मुक्त होऊ इच्छित असू शकतील. जसेः अतिमद्यपान व त्या नशेत अजिबात कामजीवन न राहणे, अतिधुम्रपान, कामजीवनातील विकृत अपेक्षा पूर्ण करून घेण्याची जबरदस्ती, भोगाची अतीलालसा, मारहाण, छळ, अपमान, यासारख्या गोष्टींनी एखादी स्त्री 'कामजीवनाची अपेक्षा करणे' सोडू शकते. तिला पुरुषांचाच एकंदर तिटकारा येऊ शकतो. अशी एक केस मी पाहिलेली आहे.

( मध्यंतरी एक बातमी आली होती एका मुस्लिम देशातील एका स्त्रीला 'तलाक' मिळाला कारण तिने अर्जात लिहिले होते की लग्नाला ३० वर्षे झाल्यापासून तिच्या पतीने आंघोळच केलेली नव्हती. अशा परिस्थितीत तिला जर स्वतःच्या नैसर्गीक शारिरिक गरजा भागवण्याची तीव्र लालसा असेल तर ती आजूबाजूच्या पुरुषांना आकर्षित करेल. पण संस्कृती किंवा पद्धती तसा वाव ठेवत नसतील, म्हणजे स्त्रीने घराच्या बाहेरच पडायचे नाही वगैरे, तर ती एखाद्या स्त्री कडे आकर्षित होणे शक्य आहे. )

१. त्याच्यामुळे समाजव्यवस्था बिघडणार नाही असे वाटते.

२. लग्नसंस्थेलाही काहीही धोका नसावा कारण समलैंगिकतेचे प्रमाण जरी कितीही असले तरी ऑपोझिट सेक्सचे आकर्षण असलेली माणसे संख्येने खूपच जास्त असावीत.

३. व्यक्तीचे समाजातील स्थान त्यावर अवलंबून नसावे असे वाटते.