मी आजही सार्वजनिक ठिकाणी फोनवर कुणाशीही नीट गप्पा-बिप्पा मारूच शकत नाही.
बरोबर आहे. सार्वजनिक ठिकाणी एकतर बोलताही येत नाही आणि दुसरं म्हणजे पार्श्वभूमीतले दिव्य आवाज ऐकून पलिकडचा काय विचार करत असेल (विशेषतः आंतर्देशीय संभाषण चालू असेल तर) याचीही काळजी एका बाजूला वाटत असते.
दुसरं म्हणजे लोक सकाळी चालायला, व्यायाम करायला बाहेर पडतात तेव्हाही एकीकडे मोबाईलवर त्यांचं संभाषण चालूच असतं. ते बघून अचंबितच व्हायला होतं. यांच्याशी रोज सकाळी सहा साडेसहाला एवढं कोण बोलत असेल किंवा रोजच यांना एवढं सकाळी सकाळी काय अर्जंट काम पडत असेल असं आश्चर्य मला नेहेमी वाटतं.
माझी आणखी एक अडचण आहे. माझा फोन नेमका अडचणीच्याच वेळेला वाजतो म्हणजे उदाहरणार्थ गाडी रिव्हर्स घेत असताना किंवा समोर हवालदार उभा असताना किंवा सकाळी अगदी घाईघाईत नेमका ऑफिसला निघताना. म्हणजे तुम्हाला फोन घेताच येणार नाही अशाच नेमक्या वेळेला हा अगदी माहिती असल्यासारखा कसा काय खणखणतो कुणास ठाऊक!
असो, बाकी तुमचं लिखाण नेहेमीसारखंच छान. पु. ले. शु.!