माझं मत याबाबतीत थोडसं वेगळं आहे आणि कदाचित चुकीचंही असू शकेल.  नोकरीत कामगाराची सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा या गोष्टी अगदी मूलभूत गरजेच्या आहेत.  त्यात बोलण्यासारखं विशेष काय?  स्वतःच्या नोकरीतल्या प्रामाणिकपणाबद्दल बोलणं म्हणजे मी ऑफीसला रोज वेळेत जातो किंवा मी मला दिलेलं काम पूर्ण करतो असं मोठेपणानं सांगण्यासारखं आहे.  या गोष्टी अगदी मूलभूत आहेत.  त्यात विशेष काय?    

जरा कोणी वेडावाकडा वागला जग साऱ्यांच्याकडेच संशयाने पाहू लागते.

मला हेही तितकसं पटत नाही.  पण त्याही पुढे जाऊन जग साऱ्यांच्याकडे संशयाने पाहू लागलं तरी काय बिघडलं.  आपण फक्त आपल्या कामाचा विचार करावा, जग काय म्हणेल याचा विचार करण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही.