हा कमी जास्त बुद्धीचाच भाग म्हटला पाहिजे.  काही वेळा या उलट अनुभव पण येतो.  ऑफिसमधल्याच काही लोकांना काम सांगायचं म्हणजे अगदी थोडक्यात सांगितलं तरी तुम्हाला नक्की काय पाहिजे ते ओळखून, त्याच्या पुढचा मागचा सगळा विचार करुन हे लोक पटकन ते काम करूनही टाकतात आणि तेच काही लोकांना मात्र अगदी चार चार वेळा शब्द न शब्द समजावून सांगावा लागतो आणि एवढं करूनही त्यात चूक हमखास ठरलेली असते!