सलग ३ दिवस काम करणाऱ्या माणसाला अटक करून शिक्षेखातर घरी पाठवावे लागते. तिथे सुट्या बळजबरीने द्याव्या लागतात. - ??.. काहीही..
तुमच्या माहितीस्तव, जपानला " द कंट्री ऑफ करोशी" [ उच्चारावर घसरू नये] म्हणजे "अतीश्रम केल्याने मरणाऱ्यांचा देश"
असे म्हटले जाते.
हा दुवा आपल्या [सामान्य] ज्ञानात भर टाकेल. दुवा क्र. १
भरपुर सुट्या, कमी उत्पादकता व सुमार हस्तकौशल्य याच्या जोरावर त्यांनी जपान घडवला का? - जपान कसा घडला हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल, किंवा लेख लिहावा लागेल.
जपानच्या प्रगतीच्या अनेक घटकांमधे, सुट्या, उत्पादकता व हस्तकौशल्य यांचे " सामायीक" योगदान असेल वा नसेल हे साध्या सामान्य ज्ञानाच्या [ मला, कॉमन सेन्स म्हणावयाचे आहे] आधारे कळण्यासारखे आहे, त्यासाठी स्वतंत्र चर्चेचा /लेखाचा प्रस्ताव चांगला असला तरी अनिवार्यता काय? म्हणुनच सुचना विशेष महत्त्वाची का? ज्याने त्याने ठरवावे.
तिथली न्यायालये आपल्या सारखी महिनोनमहिने झोपतात? कृपया, अप/गैर समज असतील तर दूर करून ज्ञानात भर टाकावी. - माहीत नाही. जाणून घ्यायची फार ईच्छा पण नाही.
मग हे इथे लिहीण्याचे प्रयोजन?
प्रतिसाद निर्भीड व तर्कसंगत असावेत ही नम्र विनंती.
धन्यवाद.