मिलिंद यांच्याप्रमाणेच मलाही हा बुद्धिचा भाग असावा असं वाटतं.

ऑफिसमधल्याच काही लोकांना काम सांगायचं म्हणजे अगदी थोडक्यात सांगितलं तरी तुम्हाला नक्की काय पाहिजे ते ओळखून, त्याच्या पुढचा मागचा सगळा विचार करून हे लोक पटकन ते काम करूनही टाकतात आणि तेच काही लोकांना मात्र अगदी चार चार वेळा शब्द न शब्द समजावून सांगावा लागतो आणि एवढं करूनही त्यात चूक हमखास ठरलेली असते!

माझं निरिक्षण असं आहे की ज्या लोकांना एकदा (खरं तर अनेकदा) शब्द न् शब्द समजावून सांगूनही व्यवस्थित कळत नाही,  ते लोक प्रत्येकवेळी मुद्दा समजावून घेण्याकरता पुन्हा पुन्हा, तेच तेच ऐकत असतात.

त्यामुळे त्यांचा मुद्दा दुसऱ्याला पटवतांना त्यांची मानसिकता अशी असते की समोरच्या व्यक्तीलासुद्धा ती गोष्ट समजून घेण्यासाठी अनेक वेळा ऐकण्याची गरज असेल. या त्यांच्या (प्रामाणीक)मानसिकतेपोटी एकच मुद्दा ते वारंवार सांगतात.

अर्थात ही एक शक्यता आहे.

सौरभ आणि लंबोदर यांच्या म्हणण्याप्रमाणे हे लोक समोरच्यापेक्षा स्वतःलाच जास्त समजावत असतील.

त्यांना माफ करा किंवा सोडून द्या हे सांगावसं तर वाटतं पण माझीसुद्धा त्या वेळेला चिडचिड होतेच