१)  ही समलैंगिकता पुढे वाढत राहणार का?

२)  आपला समाज त्यामुळे विस्कळीत होईल का?

३)  यामुळे आपली लग्नसंस्था धोक्यात येईल का?

४)  एखाद्या विवाहित पुरुषाने असे संबंध ठेवणे समाजाला रुचेल का)

५) ह्या व्यक्तींना समाजात कोणते स्थान असेल.

उत्तरेः

१. समाजाने प्रोत्साहित, उत्तेजीत, संरक्षीत केल्यास वाढत राहिल. समाजाने ताडीत, दंडीत केल्यास कमी होत जाईल.

२. एखाद्या समाजाची तुलना त्याच्या विस्तारीकरणानुसार, एखाद्या डबक्याशी, तळ्याशी, सरोवराशी, उपसागराशी, समुद्राशी, महासागराशी देखील करता येईल. "अशा" प्रवृत्तींच्या समुहाची तुलना त्याच्या विस्तारीकरणानुसार, मोरी, नाली, नाला, मृतसमुद्र [ यात सुद्धा काहीतरी सुपरिणाम घडवणारे घटक असल्याचे ऐकिवात आहे. ] अशा प्रवाहांशी करता येईल.

यात काय मोठा संच व काय उपसंच [ सेट थियरी वाचावी] हे आपणास सांगणे न लगे.

पण प्रत्येक समाजाने आपला समाज " मानससरोवर ठेवायचा / करायचा की मृतसमुद्र करायचा की नाला वा तत्सम करायचा हे त्या त्या समाजधुरिणांनी ठरवायचे".

आत येणाऱ्या अवांछित घटकाच्या प्रमाणावर व सातत्यावर , त्या त्या समाजाचे विस्कळीत होणे / न होणे अवलंबून असेल.

तुम्हाला अवांछित असे लोक किती तुमच्या घरात येतात, किती सातत्यपुर्ण येतात यावर तुमच्या घराचे घडणे / बिघडणे अवलंबून असेल नाही का? ------------ इथे तुम्हाला हे वैयक्तीक नाही.

४. कोणत्या समाजाला रुचेल का? समलिंगी की विषमलिंगी? स्पष्ट करावे.

५. अशा व्यक्ती प्रोत्साहित, उत्तेजीत व संरक्षीत असतील, तर उच्च   व ताडीत, दंडीत असतील तर निच्च. सगळे तुमच्या आमच्या म्हणजेच समाजघटकांच्यावर अवलंबून आहे.

धन्यवाद.