मिलिंदराव,
"विल यु क्लीन द कोरीअँडर?" अधिक योग्य आहे हे पटले. त्यात स्पष्टपणे, "एखादे काम करणार (की नाही)?" असा प्रश्न आहे. "कॅन यु क्लीन द कोरीअँडर?" या प्रश्नाला एखादा इरसाल "आय कॅन, बट आय वोंट" असे उत्तर देऊन मोकळा होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. (खरं तर तो इरसाल "विल यु क्लीन द कोरीअँडर?" या प्रश्नाला "नो, आय वोंट" असंही उत्तर देऊ शकतो )
अवांतरः विनंती करताना 'कॅन' ने वाक्याची सुरुवात करतात, असा माझा समज आहे. उदा. "कॅन यु कम हिअर? "
तो चुकीचा असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.