धोपटपणे
'कॅन यु डु धिस?' = 'हे करू शकशील का ? '
'विल यु डु धिस?' = 'हे करशील का ? '

'कॅन' चा वापर खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो
१) ऍबिलिटी - क्षमता
२) पॉसिबिलिटी - शक्यता
३) परमिशन - परवानगी (काहींना 'कॅन' चा हा वापर मान्य नाही. ह्या अर्थाने 'कॅन' 'मे' हून कमी औपचारिक समजले जाते.)

'विल' चा वापर खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो
१) विलिंगनेस - एखादी गोष्ट करण्याची तयारी दर्शवण्यासाठी
२) इंटेन्शन - इरादा (विशेषतः प्रथमपुरुषी, जसे : 'आय विल डू माय होमवर्क टुमॉरो'. )
३) प्रेडिक्शन - भाकित (जसे : 'द मॉन्सून विल ऍराईव सून.')