काय गंमत आहे. डॉक्टर म्हणतात म्हातारपणी मीठ, साखर, तेल कमी करा पण ही पद्धत त्याच्या अगदी विरुद्ध आहे असं दिसतंय. चकली चघळून थुंकली तरी तिचं मीठ आणि तेल तर पोटात जाणारच लाळेतून पण चांगला भाग म्हणजे भाजणीचे पीठ  मात्र थुंकून टाकणार.

त्यापेक्षा थोडे प्रयोग करून कमी मीठाची आणि कमी तेलातली चकली करता येणार नाही का?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय झालंच आहे तर उगाच जास्त जगण्याचा मोह धरण्याऐवजी मस्त हवं ते खाऊन मरावं अशा मताचा मी आहे. ते करायचं नसेल तर संयम पाळावा. ही पद्धत आधी कोणाला सुचली नसेल असं नाही पण ती प्रचलित नाही याचा योग्य तो बोध घ्यावा.