अगदीच खरं आहे हे! पण मी माझा मोठेपणा सांगण्याकरता हे लिहलेच नाही. पुनः एकदा माझ्या लेखातील महत्त्वाच्या परिच्छेदाकडे लक्ष वेधतो.
हे सर्व सांगण्याचा माझा हेतू स्वतःची टिमकी वाजवण्याचा नक्कीच नाही. अशी प्रामाणिकपणे नोकरी करणारा मी काही एकटाच नाही. माझे हजारो सहकारी - मग ते लिपिक असोत की अधिकारी- याच प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे काम आज ही करित आहेत. तेव्हा माझी वागणूक काही नवलाई नव्हे!
जग भल्यांचेच आहे हेच मला आवर्जून सांगायचे आहे. माझे उदाहरण एक अगदी मामुली प्रतिनिधिक आहे.