एक म्हणजे गेल्या ५० वर्षातील योगदानाविषयी बोलणे हे भूतकाळाविषयीच बोलणे आहे नाही का?
५० वर्षे म्हणजे स्वातंत्रप्राप्तीनंतरचा काळ, हा भूतकाळ खराच. पण सरकारच्या दबावामुळे म्हणा किंवा समाजसुधारकांमुळे वा स्विकारलेल्या लोकशाहीमूळे म्हणा शोषीत वर्गाला माणसांसारखे जगण्याचे हक्क मीळाले.
त्या वर्गाला धर्माच्या जोखडात बांधून त्यांचे शोषण करण्यात आपला थोडाफार हातभार होता हे मान्य करण्यास व त्यांना धार्मीक व सामाजीक स्तरावर समान हक्क मीळावेत म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले?
पुजा-अर्चा जावूद्या अंत्यविधी तरी इतरांना करावा म्हणून तुम्ही काही प्रयत्न केले का?
या प्रश्नाला मीळालेली उत्तरे मात्र मनोरंजक होती.