ठीक आहे आता नेटवर बघा आणि भाषांतर बरे आहे का सांगा बरे.

बघितलं. छान जमलंय.

तुमच्या सारख्या अभ्यासू वाचकाने कौतुक केले की बरे वाटते.

बास काय राव, उगीच लाजवताय गरिबाला! अभ्यास कसला, जिथे जेव्हा काही थोडंसं माहीत आहे किंवा काही थोडंफार कळतंय किंवा काही मत आहे असं वाटतं, तिथे तेव्हा लिहून टाकतो झालं. 'चूभूद्याघ्या' हे डिस्क्लेमर दर वेळी आठवणीनं टाकतोच असं नाही, एवढंच. (मात्र ते गृहीत असतंच. )

(तुम्ही हिंदी अगदी परफेक्ट लिहिता बर का. )

आभारी आहे! (या कौतुकानं मात्र मनापासून बरं वाटलं. ) काहीही लिहिताना शक्य तेवढं घासूनपुसून लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही चुका होतात कधीकधी, पण शक्य तेवढ्या प्रयत्नपूर्वक टाळतो. (आता वरचंच ध्रुवपद लिहिताना एक टायपो छापाची बारीक चूक झाली. नंतर लक्षात आली. आता सुधारण्याची सोय नाही. जाऊ द्या.)