सोशली कंडिशंड मंडळी सतत प्रश्‍नच विचारताना दिसतात. अन कोणी, यांच्या प्रश्‍नाला खरी उत्तरे देत असेल [ पृच्छकास माहिती, ज्ञान हवे असे समजून ] तर तो खेळ खेळतो आहे असे समजतात. हीच मंडळी, कोणाच्याही प्रश्‍नाचे साधे, सरळ, सोपे उत्तर देताना दिसत नाहीत. कोणाचे भले व्हावे याउद्देशाने प्रेरीत नसतात. संवादातून दुसऱ्या माणसाचा कोणताच फायदा होणारच नाही याकडे यांचे विशेष लक्ष असते.

कोणालाही नेमका पत्ता सांगणे यांच्या जिवावर बेतल्यागत होते.

हे अधुनीक सॉक्रेटिस माहितीच्या आधारे ज्ञानी, पंडीत बनण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात असतात. त्यांना, वस्तुनिष्ठ अंक, माहिती, ज्ञान व पांडित्य यातला सुक्ष्मभेदाचा गंधही नसतो. बोलबच्चन कौशल्यावर ते ज्ञानीमाणसावर ते वर्चस्व गाजवू पाहतात. ही व्यापारी मानसिकता इंग्रजांकडे ठासून भरली होती, त्यानंतर त्यांच्या पावलावरपाऊल ठेवत, सद्य व्यापाऱ्यांनी ती जशीच्या तशी स्विकारलेली दिसते.

लेख स्मरणीय आहे, मी वाचनखुणांत नोंदले आहे.

धन्यवाद!