सुट्ट्या किती असाव्या यापेक्षा कामाच्या दिवशी किती खटले पुढे सरकतात ते पाहावे. जोपर्यंत या देशात, कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन,, तारखांवर तारखा पडत राहतात तोपर्यंत कुठल्याही खटल्याचा लवकर निकाल लागणे शक्य नाही.
आधीच न पेलणारी लोकसंख्या, वकिली कावे, दफ्तरदिरंगाई, न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारांना सोडवण्यात धन्यता मानणारे आणि त्या प्रसिद्धीवरच आपली फी ठरवणारे वकील अशी न संपणारी लिस्ट आहे.
सुट्ट्या अजिबात काढून टाकल्या तर वकिलांची कमाई वाढेल, खटले तसेच रेंगाळतील.