कॅनने वर दिल्याप्रमाणे--क्षमता, शक्यता आणि परवानगी दाखवतात.  परंतु कुड वापरतात ते-- भूतकाळातली क्षमता(आय नेव्हर कुड प्ले गिटार), वर्तमानकाळातली किंवा भविष्यकाळातली परवानगी(कुड आय स्मोक हिअर?), वर्तमानकाळातली खरी किंवा काल्पनिक शक्यता(द रोड कुड बी ब्लॉक्ड), पूर्णतः अशक्य गोष्टीवर आधारलेली शक्यता(इफ वी हॅड मोअर मनी, वी कुड बाय अ कार) आणि राजी असणे (विलिंगनेस) यासाठी. 'कोथिंबीर निवडायला तू विलिंग आहेस' का यासाठी कुड यू ड्रेस द कोरियॅन्डर? असेच म्हणणे योग्य आहे, कॅन किंवा विल चालणार नाही.