तुमचा गूढ प्रवास जी. एं. च्या मार्गाने चालुच आहे. आम्हीही तुमच्या या गारुडाने भारले जाऊन तुमच्या प्रत्येक लिखाणाचा पाठपुरावा करत आहोत. काहीवेळा, त्यातील अर्थ जाणवतो, काहीवेळा त्यातून अनेक अर्थ निघू पहातात. आत्ताचा हा प्रवास आपल्या देशाच्या स्थितीवर आहे की आणखी काही वेगळेच ? जाणून घ्यायला आवडेल. एकच विनंती, तुम्ही जी. एं सारखे रसिक वाचकांना टाळू नका. नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. जाहीर स्पष्टीकरण नको असेल तर व्य. नि. पाठवून तरी आम्हाला मदत करा, तुमच्या वैचारिक पातळीवर यायला!