समाजाने प्रोत्साहित, उत्तेजीत, संरक्षीत केल्यास वाढत राहिल. समाजाने ताडीत, दंडीत केल्यास कमी होत जाईल.

माफ करा पण आपल्या समाजात असे काही होत नाही याचे आज खरेच बरे वाटले किंबहुना, आपली शासनव्यवस्था इतकी रानटी नाही याचेही.

आधी, काही लोकांनी ही विकृती आहे, तिला उपचारांची गरज आहे असे म्हटल्यावर नंतर अशा लोकांना शिक्षा, दंड करणे असे म्हणणे हे केवळ रानटीपणाचे लक्षण. भारतातही असे काही होईल असे वाटत नाही आणि असे होणार नाही हे पाहून हायसे वाटले.

 मुद्दा क्र. ३ विषमलिंगी माणसांच्याबाबत कसा खरा नाही बरे. उगीचच समलिंगींच्या नावावर चिकटवलेले मुद्दे आहेत.

असो. समलैंगिकता ही विकृती आहे किंवा नाही यावर कोणतेही मत मांडण्यास मी तज्ज्ञ नाही. समाजाशी विसंगत असे काही दिसले तर त्याकडे फटकून राहणे हे मला चुकीचे वाटत नाही. हा ज्याच्या त्याच्या समजूतीचा आणि संस्कारांचा प्रश्न झाला. अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावे किंवा न द्यावे हा देखील वैयक्तिक प्रश्न आहे. दोन्ही गटांनी आपापली मते एकमेकांवर थोपवणे योग्य नाही.

जी जहाल मते समलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांकडून वाचली त्यातील काही निश्चितच माणूसकीला सोडून आहेत जसे हे आणि सुदैवाने भारतासारख्या देशातही असे होत नाही आणि असे होणार नाही.