ही आर्या रुक्मिणी-स्वयंवराशी संबंधित आहे.
कृष्णाने (हंसाने) रुक्मिणीस (मुक्ता= मोत्यांची माळ) पळवले. इतर राजे (काक = कावळे) कलकलाट करू लागले. त्यांच्या त्या हाकांचा आवाज (ध्वनी) इतका मोठा होता की तो देवांच्या (सुरांच्या) कानावर (स्वर्गात) गेला.