सोशली कंडिशंड मंडळी सतत प्रश्‍नच विचारताना दिसतात. अन कोणी, यांच्या प्रश्‍नाला खरी उत्तरे देत असेल [ पृच्छकास माहिती, ज्ञान हवे असे समजून ] तर तो खेळ खेळतो आहे असे समजतात. हीच मंडळी, कोणाच्याही प्रश्‍नाचे साधे, सरळ, सोपे उत्तर देताना दिसत नाहीत. कोणाचे भले व्हावे याउद्देशाने प्रेरीत नसतात. संवादातून दुसऱ्या माणसाचा कोणताच फायदा होणारच नाही याकडे यांचे विशेष लक्ष असते.

ह्यात "सोशली कंडिशंड मंडळी" म्हणजे कोणती हा प्रश्न मला नक्कीच आहे पण माझ्या अनुभवानुसार मी तुम्ही वर्णीनेल्या लोकांचे अशा प्रकारातून मिळवलेले यश फार क्षणीक असते हे म्हणू शकतो. 
आणखी एक नेहमीचा अनुभव असाही आहे की, उत्तरे देणाराही बऱ्याच वेळा ते योग्यपणे देत नाही व जास्त प्रश्न विचारल्यावर राग येणे हे ही दिसुन येते. 

ही व्यापारी मानसिकता इंग्रजांकडे ठासून भरली होती, त्यानंतर त्यांच्या पावलावरपाऊल ठेवत, सद्य व्यापाऱ्यांनी ती जशीच्या तशी स्विकारलेली दिसते.

कपट, कारस्थान हे इंग्रजांनी भारतात आणले असे म्हणणे पटत नाही. महाभारतात हे ठासून भरलेले आहे. तसेच कौटिल्यीय अर्थशास्त्रातील विषेशतः "राजाने हेर कसे नेमावे" हा विभाग पहावा. 

वरील प्रश्नावली शिक्षणशास्त्रात वापरुन काही प्रयोग करता येतील असे वाटते.
(काही भाग वगळला. : प्रशासक)