कधीकधी आर्थिक, सामाजिक, खेळ, इ. यांविषयावरील अग्रलेख प्रसिद्ध होतात. तेव्हा असे अग्रलेख वाचताना वाचक कधीकधी कंटाळतात. - आपल्या सर्वेक्षणात आपण किती वाचकांचा अभिप्राय घेतलात?

त्याचे तीन प्रकारे वर्गिकरण करता येईल. १)राजकीय विचार २) तटस्थ भुमिका ३) प्रसिद्ध व्यक्तीस मानाचा पुरस्कार मिळाल्यास अथवा प्रसिद्ध व्यक्ती मरण पावल्यास लिहीण्यात येणारे अग्रलेख. - नाही पटले. अग्रलेख हे कुठल्याही विषयावर असू शकतात. उदा. दहशतवादी हल्ले, क्रिकेट मधील जय/पराजय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विविध आर्थिक विषय वगैरे. अर्थात, बऱ्याच विषयांना राजकीय अंग/किनार असू शकते, पण म्हणून तो विषय राजकीय होतो का?

अजून एक, आपले हे सर्वेक्षण आपण किती काळ केले? किती भाषांतील वृत्तपत्रांवर केले? ह्याचा ही तपशील पुरवावा. (असेल तर)

धन्यवाद.