१. मुंबईचे तापमान सुखद असले तरीही दमटपणापण असतो.

२. मुंबईची माणसे हवामानाबद्दल तक्रार करत नाहीत तशी अमरावतीची माणसेही ४७ तापमानाची तक्रार करत नाहीत. तक्रार करून काय होणार? तिथेच राहायचे म्हंटल्यावर काहीतरी सोय करून घ्यावी लागते.

३. पुण्यातील दुकाने - यावर मी बरेच वर्षे ऐकत आहे. सध्या दुकाने फारशी बंद नसतातही अन असली तरी जे हवे ते जवळपास निश्चीत मिळते. ( बाकी रात्री अडीच वाजता चहाच काय उसळ-पाव वगैरेही मिळते. त्याची फार लोकांना गरज वाटत नाही कारण जरा बऱ्या वेळेस लोक घरी येऊ शकतात. )

४. बसची संख्या - प्रवासी मिळत नाहीत म्हणून बसची संख्या कमी असणे यात गैर काय आहे? जर माणसांना बस नको असेल किंवा माणसेच कमी असतील तर तसे होणारच की! हां! आता त्याचवेळेस ज्यांना बस हवी आहे त्यांना मिळाली नाही असेही होऊ शकेल. तो प्रॉब्लेम आहे खरा. पण मला स्वतःला मुंबईला तीन तीन / चार चार लोकल ट्रेन्स सोडून दिल्यावर एखादी पकडता येते. इतकी गर्दीपण चांगली नाही, फक्त वाहतुक-संस्थांना फायदा व्हावा म्हणुन!

नाही का?