आर्या हे मात्रावृत्त आहे आणि त्याचे विवेचन श्री. गो. रा. वाळंबे लिखित आणि गो य. राणे प्रकाशित "सुगम मराठी व्याकरण लेखन " या पुस्तकात केलेले विवेचन असे आहे.
आर्या हे अर्धसम मात्रावृत्त आहे ; त्याचे दोन मोठे भाग दिसत असले तरी प्रत्येक चरणाचे पूर्वार्ध ( १२ मात्रांचा )व उत्तरार्ध ( १८ मात्रांचा)
असे दोन भाग पडतात.त्यानुसार पाहता
न दिसे अग, नग, मग तग गगनी नीच काय काढील?
१ १ २ १ १ १ १ १ १ १ १= १२ १ १ २ २ १ २ १ २ २ १ = १५चित्ती म्हणे समय हा मज काळाच्याही मुखात ओढील!
२ २ १ २ १ १ १ २ = १२ १ १ २ २ २ २ १ २ १ २ २ १ = १९
अशा मात्रा होतात. त्या विवेचनाशी सुसंगत नाहीत