लेख आवडला! लेख आवडला कारण माझी ही अशीच भावना होते, जेव्हा मला कोणी अंकल म्हणतो. हल्ली मुंबईत अंकल म्हणूनच अनोळखी लोकं संभाषण सुरू करतात. 'भाऊ', 'दादा' हे मराठी शब्द जरी उच्चारले जात नाहीत तरी कमीतकमी 'भायसाहब' असं ही कुणी म्हणत नाही. थेट अंकल म्हणूनच बोलायला सुरवात करतात.
पण मी ही त्यावर माझ्यापुरता तोडगा काढलाय. मीच स्वतःलाच समजावतो कि, समोरच्या व्यक्तीला माझ्याशी (त्याच्यापुरतं) आदरानेच बोलायचं आहे परंतु भावनिक नातंही जोडायचं नाही आहे, म्हणून तो तसे बोलतोय. असा समज करून घेतला की मला वाईट ही वाटत नाही व मी ही अगदी निर्विकार राहील्यामुळे त्याच्यावर वैतागत नाही.