लेख खूप आवडला कारण तो छानसा चुरचुरीत झाला आहे.

काकू या शब्दावरून एक जुनी गंमत आठवली. मी सातव्या इयत्तेत (१९५४) असतांना
आमच्या वर्गात एक नवीन मुलगी दाखल झाली होती. तिचे नांव होते कु. कालिंदी कुशाभाऊ भिडे.
कुणी तरी तिच्या का. कु. या आद्याक्षरावरून आधी काकू भिडे चिडवले आणि मग ती कायमचीच
भिडे काकू झाली. सुरुवातीला ती खूप चिडायची. पण नंतर तीही या गमतीत सामील व्हायला लागली.
तो प्रकार इतका गंमतीचा पण निकोप झाला की, आमचे एक मिष्किल स्वभावाचे वर्गशिक्षक हजेरी घेतांनाही
तिचे भिडे काकू असेच नांव पुकारीत.