काकू , आंटी हे सगळ मानण्यावर आहे. मनाने काकू आंटी होउ नका कधी, मग झाले तर....

सगळे आपोआप नावाने हाक मरू लागतिल. प्रयत्न करून पहा...


सहमत!

किंबहुना आजकाल लहान मुलांनी आईबापांनाच नव्हे तर आजीआजोबांनासुद्धा नावाने हाक मारण्याचा जमाना आहे / येऊ घातला आहे. (डिस्क्लेमरः यात काहीही गैर नाही. उलट छान वाटते. निदान मला तरी. आमचे चिरंजीव इतर समवयस्कांच्या नादी लागून ज्या दिवसापासून आम्हास आमच्या नावाने हाक मारण्याऐवजी समाजमान्य संबोधनांनी पुकारू लागले, तो दिवस आमच्या चरित्रात - जर कोणी लिहिलेच तर - काळ्या अक्षरांनी नोंदवला जावा अशी आमची इच्छा आहे. संगतीचा दुष्परिणाम म्हणतात ते यालाच! सुदैवाने उपरोल्लेखित इतरांच्या बाबतीत आमच्या चिरंजिवांना अशा वाईट सवयी अजूनपर्यंत तरी लागलेल्या नाहीत आणि 'संस्कारां'च्या नावाखाली अजून तरी त्या कोणी लावलेल्याही नाहीत - किंबहुना अशा वाईट सवयी त्यांना लावल्याच पाहिजेत असे अशा संबोधनांच्या 'लाभधारकां'ना वाटतही नाही - हाच काय तो दुःखात सुखाचा भाग आहे.) त्या धर्तीवर 'काका', 'काकू', 'मावशी', 'अंकल', 'आंटी' वगैरेंचे संपूर्णपणे उच्चाटन होऊन सर्वांना नावाने हाक मारण्याची पद्धत समाजात ज्या दिवशी पूर्णपणे रुळेल, तो सुदिन. (अर्थात तेव्हासुद्धा ज्याचे/जिचे  नाव माहीत नाही अशा व्यक्तीला कसे संबोधले जाईल हा प्रश्नच आहे. कदाचित 'अहो शुकशुक' ऐवजी 'अग/अरे शुकशुक'? )