"नशेत आहे तुझ्यामुळे मी, जबाबदारी तुझीच आहे

असेल किंवा नसेल माझा मलाच पत्ता, तुझ्या घरी ने

जिथून झाले सुरू तिथे पोचणे कुणालाच शक्य नाही
'कुठून झाले सुरू' सदा आठवेल जेथे, तिथे तरी ने

बनेल 'माझी' कधीतरी ती, असे मला भासवायची ती
खरेच आहे म्हणा! तिनेही बरेच केले तिच्या परीने"            .... उत्तम !