आर्या लिहता लिहता, खग हा शब्द लिहण्याचा राहून गेला आहे. महेश यांनी तो नेमका ओळखला. धन्यवाद. अर्थ लिहताना या 'खग' शब्दाचा देखील अर्थ (मूळ आर्येत राहून गेलेला शब्द) सांगितला होता.

दुसऱ्या ओळीमधील 'ही' बाबत मी एवढेच म्हणू शकेन की ती नसेल ही कदाचित! पूर्वी कधी तरी पाठ केलेल्या या आर्या! त्या तशाच (कदाचित चुकीच्या सुद्धा) तोंडात बसलेल्या असू शकतील. श्री. कुशाग्र, त्यांनी धारण केलेल्या नावाप्रमाणे कुशाग्र आहेत हेच येथे सिद्ध होते. मी त्यांचा अभारी आहे. 

पुढील आर्या देताना मी,  माझ्या परीने, अधिक काळजी घेईन!