उकडणे अनेकदा मानसिक असते.  शांत स्वभावाच्या माणसाला फारसे उकडत नाही. मुंबईकराला का उकडत नाही याचा विचार करावा. अमरावतीला ४७ तापमानाला कुणी घराबाहेर पडत नाही. मुंबईत केव्हाही बाहेर पडता येते यावरून मुंबईचे हवामान सुखद आहे हे सिद्ध होते. पुण्यात अजूनही दुकाने दुपारी बंद असतात हे सत्य आहे, यावर निष्कारण चर्चा नको. सारेगमपच्या कार्यक्रमात एका परीक्षकाने या गोष्टीचा उल्लेख करून हशा नि टाळ्या घेतल्या होत्या. मुंबईतही दुपारच्या बसेस किंवा लोकल गाड्यात कमी गर्दी असते, म्हणून तिथे गाड्या सोडणे बंद करीत नाहीत, पुण्यात करतात. पुण्यात रात्री अडीचला चहा-उसळ-पाव मिळतो यावर विश्वास ठेवणे अशक्य. दुपारी आइस्क्रीम मिळत नाही तिथे रात्री चहा कसा मिळणार? पूर्वी इराण्याची हॉटेले रात्री दोनला बंद होऊन सकाळी चारला उघडायची.  तिथे पाव मिळायचा, उसळ नाही. आता इराण्याची हॉटेलेच नाहीत.