ती ताई बघ कशी अंकलशी खेळते आहे
टीना मुनीमचे लग्न करावे असा विचार टीना मुनीमच्या आईच्या मनात आला, त्या अर्थी टीना मुनीम (त्या चित्रपटात तरी) अविवाहित आहे आणि विवाहयोग्य वयाची (असे काही असले तर) आहे. म्हणजे (त्या लहान मुलाच्या दृष्टिकोनातून) 'ताई' म्हणता येण्याइतपतच मोठी आहे, आणि (अविवाहित असल्याकारणाने) 'काकू' तर म्हणता येण्यासारखी नाही.
राजेश खन्ना तसाही 'अंकल' म्हणण्यासारखाच दिसतो. (कोणाच्याही दृष्टिकोनातून असे माझे मत. ते ग्राह्य धरले नाही तरी त्या लहान मुलाच्या दृष्टिकोनातून तरी नक्कीच.)
बरे, टीना मुनीम त्या गाण्यात राजेश खन्नाबरोबर जे काही करत आहे त्याला 'खेळ करणे' म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणजे 'टीना मुनीम राजेश खन्नाशी खेळते आहे' हे विधानही खोटे नाही.
मग आक्षेप नेमका कशाला आहे?