आता इराण्याची हॉटेलेच नाहीत.
हाँगकाँग गल्लीच्या नाक्यावरचे 'लकी रेष्टारंट' बंद पडल्याबद्दल ऐकले होते, आणि 'क्याफे सनराइझ' टुकार दर्जाचे इडलीसांबार आणि 'मटण बर्गर'च्या नावाखाली एक अत्यंत अभद्र आणि अखाद्य (म्हणजे न खाण्याच्या लायकीचा) प्रकार (पूर्वी असंख्य गिऱ्हाइकांनी उष्टावलेल्या रीसाइकल्ड भोपळ्याच्या सॉससमवेत) अगणित वर्षांपासून विकत आला आहे. पण...
भांडारकर रस्त्यावरचे 'क्याफे गुडलक' कधी बंद झाले? (अरेरे!!! एकेकाळी माझी रोजची दुपार की हो तेथे कटत असे! वाईट वाटले!) की 'जनसेवा'च्या उपाध्यांनी ताब्यात घेऊन आता तेथे मस्कापाव, आमलेट आणि कोंबडीच्या तंगडीऐवजी साबूदाणा खिचडी, खरवस आणि पियूष मिळू लागले आहे? क्यांपातली समस्त इराणी हाटेले आता उडप्यांनी चालवायला घेऊन तेथे इडली सांबार, उत्तप्पा आणि मसाला डोसा विकत आहेत काय?
(काही भाग वगळला. : प्रशासक)