सगळे पुणे एके काळी दुपारी १ ते ४ बंद असायचे असे मी ऐकून आहे. मला तर त्यात काहीच गैर वाटत नाही. उलट माझ्या दृष्टिने ही आदर्श जीवनशैली आहे. सकाळी पहाटे लवकर उठून, ८,९ पर्यंत कामाला जावे. १ पर्यंत काम करावे. जेवावे, डुलकी काढावी  , चहा घ्यावा, परत ४ ते ७ काम करावे. दुपारी जरा आराम करायला मिळाला तर कोणाला नाही आवडणार? इटली मध्ये सुद्धा लोक दुपारी २,३ तास लंच ब्रेक घेतात. माझ्या दृष्टिने ही अतिशय उच्च प्रतीची जीवनशैली आहे. आता आवश्यक दुकाने जसे मेडिकल वगैरे चालू असावित.