विकि, तुम्ही लेख लिहिताना सर्व अग्रलेख फक्त संपादकच लिहीतो असे गृहीत धरले आहे का? मला तरी वाटते, ते तसे नसावे. संपादकाला आधिच खूप कामे असतात. संपादकाच्या हाताखाली सहसंपादक, उपसंपादक हे ही असतात. अग्रलेख हे ह्या मंडळीकडून ही लिहीले जाण्याची शक्यता असेल. तसेच विशिष्ठ विशयाबाबतीत त्या विशयाच्या पत्रकाराकडूनच अग्रलेखाचे स्वरूप कसे असावे याची चर्चा ही होत असावी.
प्रसिद्ध व्यक्तींबाबत म्हणायचं झालं तर त्यांच्या बद्दलचं लिखाण आधिच होतकरू पत्रकारांकडून लिहून ठेवले जात असेलही. म्हणजे कोण कधी 'गचकला' की त्या संदर्भातील लेख लगेच दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात छापायला तयार!!!
सध्याच्या काळात फक्त काही विशेष घडलं असेल तरच मी अग्रलेखांकडे (नुसतं) पाहतो.
लेख अगदी मेहनतीने लिहीला आहे त्याबद्दल आपलं कौतुक वाटतं.
(काही भाग वगळला. : प्रशासक)