कुशाग्र,
मला आठवतात त्या याच चालीच्या दोन रचनाः
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवती ।
मलये भिल्ल पुरंध्री, चंदनतरूकाष्ठमिंधनं कुरूते ॥
म्हणजे
अती परिचय झाला असता अवज्ञा होते,
नेहमी नेहमी जाण्याने अनादर होतो,
चंदनवृक्ष कितीही किंमती असला तरीही
मलय पर्वतावरील भिल्ल युवती चंदनाचा उपयोग इंधन म्हणूनच करते!
तसेच
न मरे यास्तव नेला, पर्वतशिखरासी लोटिला खोली ।
परी तो निर्भय चित्ती वाहे नारायणास लाखोली ॥
या दोन्ही रचना आर्या आहेत काहो?