चर्चा वाचून भयंकर करमणूक झाली. त्याबद्दल सर्वांचे आभार.
वर कोणीतरी इतरही शहरे आहेत असे सांगितले. पण त्यांनी मध्ये पडू नये त्याचे कारण थोडक्यात सांगतो. आता माझ्याकडून दोन पैसे (तेवढीच सगळ्यांची करमणूक):

मुंबई-पुणे याच दोन शहरांमध्ये हा वाद होऊ शकतो कारण ऐतिहासिक आहे. पेशव्यांनी मराठ्यांची राजधानी पुण्यात आणली.. मात्र पुढे तो लौकीक न टिकल्याने म्हणा / न टिकवता आल्याने म्हणा कानामागून आलेली इंग्रजांची मुंबई भलतीच तिखट होऊ लागली.

बरं इंग्रजांच्या मर्जीमुळे मुंबईत अनेक पायाभुत सुविधा तयार झाल्या त्यावेळी पुणं पेशवाईच्या कोषातच गुरफटलेलं होतं... जेव्हा पेशवाईचा कोष फाटला तोपर्यंत जग प्रचंड पुढे गेलं होतं  आणि त्याबरोबर मुंबई पुण्यापेक्षा मोठी आणि प्रसिद्ध नगरी झाली होती.

स्वातंत्र्यचळवळीनंतर महाराष्ट्र झाला. त्यातही मुंबईला आंदोलन करून मिळवले गेले आणि चक्क महाराष्ट्राची राजधानी बनवले. पुण्याला साधा उपराजधानीचा दर्जाही देण्यात आला नाहि. राजधानीपासून - महाराष्ट्रातील अनेक नगरांपैकी एक असा प्रवास केलेल्या  पुण्याला जी जाणीव झाली त्याची परिणीती ह्या मुंबई-पुणे वादात होते :)

बाकी मला वैयक्तीकरित्या मुंबई आवडते. त्याला कारण काहिही नाहि. बस्स आवडते.

-ऋषिकेश मुंबईकर