मि असाच फक्त कांदा आणि गाजर घालून करते. कांदा उभा पातळ चिरायचा , गाजर किसून घ्यायच.
असे केल्याससुद्धा उत्तप्पा छानच लागेल यात वाद नाही, परंतु मग तत्त्वतः त्याला 'स्प्रिंग' उत्तप्पा म्हणता येईल का?
'स्प्रिंग' उत्तप्पा या नामाभिधानातील 'स्प्रिंग'चा संबंध घड्याळातील, गादीतील अथवा बॉलपेनातील स्प्रिंगांशी नसून पातीचा कांदा अर्थात 'स्प्रिंग ऑनियन'मधील 'स्प्रिंग'शी असावा, अशी माझी समजूत आहे. ('शंकरपाळ्या'तील 'शंकरा'चा संबंध त्रिनयनी महादेवाशी नसून 'शक्कर' अर्थात साखरेशी असावा, तद्वत.)
त्यामुळे (मूळ पाककृतीत दिल्याप्रमाणे) कोठलाही कांदा नव्हे, तर पातीचा कांदा (किंवा खरे तर कांद्याची पात) घातल्याशिवाय उत्तप्पा चवीला कितीही सुंदर झाला, तरी त्याला 'स्प्रिंग' उत्तप्पा म्हणता येऊ नये, असे वाटते. (तत्त्वाचा प्रश्न. चूभूद्याघ्या.)