आपण हे सर्वेक्षण करून ते लोकांपुढे ठेवलेत त्याबद्दल... पण एक सूचना करावीशी वाटते. २० हा काही फार मोठा आकडा नाही. तेव्हढ्यावरून निष्कर्ष काढणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. त्यातून २० म्हणजे, ते आपल्याच ओळखीतले, नातेवाईक, मित्र वगैरे असणार. त्यापेक्षा, भिन्न जातीचे, धर्माचे, वयाचे, भिन्न व्यवसायाचे तसेच भिन्न शहरातल्या लोकांची मतं घेतली तर हे सर्वेक्षण अधिक अर्थपूर्ण होईल.

अजून एक, कुठलेही सर्वेक्षण करण्याआधी ते कशासाठी करायचे ते ठरवतात. आपण हे कशासाठी केले? म्हणजे वाचकांना जरा बॅकराउंड मिळेल.