उकडणे अनेकदा मानसिक असते. शांत स्वभावाच्या माणसाला फारसे उकडत नाही.
हे वाचून भरपूर करमणूक झाली. माणसांच्या साधारण क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा असेल - उदा. तापमान ४० ते ५० सें.च्या दरम्यान असेल तर तो सगळ्यांनाच जाणवतो मानसिक, अमानसिक सगळ्यांनाच - अमरावतीला, पुण्याला किंवा अजून कुठेही.
हा आता काही माणसं असतात ती कधीही कुरकूर करतात, पण अशी माणसं आणि आनंदानं आला दिवस घालवणारी माणसं जगात सगळीकडेच असतात. ती काही एका गावाची मक्तेदारी नाही.
फक्त पुण्याची माणसं तक्रार करणारी या स्टिरीओटाईपमधून (मराठी?) मुंबईकर बाहेर कधी येणार हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे.
थोडेसे अवांतरः - दोन-तीन वर्षापूर्वी मी जेव्हा पुण्याची वारी केली होती एप्रिल मे मध्ये तेव्हा रोजचे तापमान ४० सें. च्या वरच होते.
आम्हाला थंडीची जास्त सवय असूनही माझी आणि माझ्या मुलीची काहीच तक्रार नव्हती, कारण १ महिन्याची सुट्टी छानपैकी नातेवाईकांत, मित्रमैत्रिणीत घालवता येत होती.
पण पुण्याला रोजचे ३ तास भारनियमामुळे वीज नसायची, बाकीच्या महाराष्ट्रातील गावात तर जास्तच वेळ - पण मुंबईला तेव्हा तरी काहीच भारनियमन नव्हते. (सध्याचे माहीत नाही.) त्यामुळे काही लोकांना खरचं त्रास होत होता. अशावेळी जर मुंबईपेक्षा इतर गावातील लोक उन्हाळ्याची तक्रार करत असतील तर फक्त त्यांना दोष देणे किती योग्य आहे?
बाकी खाली ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाची काही वैयक्तिक कारणे असतील कोणतेही शहर आवडण्याचे, त्यासाठी कोणाला मुंबई आवडत असेल तर पुण्याला वाईट ठरवण्याची गरजच काय?
सखी - पूणेकर