हा विनोद वाचून फारच करमणुक झाली.
मुंबईत केव्हाही घराबाहेर 'पडता येते' असे नसून 'पडावे लागते' असे आहे.
पुण्यातील दुकाने अजूनही बंद असतात असे आपले म्हणणे! निष्कारण चर्चा नको असे आपण म्हणणे माझ्यामते गैर आहे. चर्चा का करू नये बरे? मी शुद्ध पुणेकर आहे, मला माहीत आहे की हल्ली बरीच दुकाने दुपारी चालू असतात.
सारेगमपच्या परीक्षकाने टाळ्या घेणे - त्याच्यात 'टाळ्या वाजवा' असे सांगीतलेले असते. परीक्षकाने तोंड उघडले की टाळ्या सुरू होतात. त्या परीक्षकाने टाळ्या घेणे हा कुठलाही निकष ठरू शकत नाही.
चहा-पाव-उसळ-रात्री अडीच वाजता मिळणे - हे मी स्वतः अनुभवले आहे. जे आपल्याला अजिबात माहीत नाही त्यावर इतके ठामपणे बोलणे माझ्यामते गैर आहे.
आता इराण्याची हॉटेल्स नाहीत - परत एकदा संपूर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारित निष्कर्ष! हॉटेल पॅरॅडाइज, हॉटेल रीगल, हॉटेल गूडलक ही हॉटेल्स अजूनही आहेत. लकी २ वेळा जळल्यामुळे व व्यावसायिक कारणांनी बंद झाले. सनराइजचे व्यवस्थापनच बदलले. कॅफे नाज व महानाज अजून आहेत. या सर्व ठिकाणी पाव-मस्का, ऑम्लेट, समोसे, पॅटीस, भुर्जी, चहा, थंड पेये असे सर्व मिळते.
पाव-उसळ - मंडईतील एका उपहारगृहामध्ये रात्रभर राईस-प्लेट, पाव-उसळ, मिसळ, भजी, चहा, थंड पेये हे सर्व मिळते. स्वादिष्टही असते. जर आपल्याला उपहारगृहाच्या दर्जाबाबतीत अडचणी असतील तर पंचतारांकित हॉटेल्सही आहेतच! तसेच स्वारगेट, शिवाजीनगर व स्टेशनवरील गाड्या अव्याहत चालू असतात. पहाटे साडे तीन वाजता उघडणारी व चहा, क्रीम रोल, केक विकणारी असंख्य छोटी हॉटेल्स मी सांगू शकतो. फक्त एवढेच की पुणेकरांना या सर्व ठिकाणांची फार गरज भासत नाही कारण ते मुळात खूप बऱ्या वेळेला घरी येऊ शकतात. बायको कामावरून रात्री दहा वाजता येणे व नवरा बारा वाजता येणे यामुळे मुंबईमध्ये स्वयंपाकाचे जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते पुण्यात फारसे होत नाहीत.
मी एक पाहत आहे की जे जे मुंबईचे गुण म्हणून नोंदवले जात आहेत ( केव्हाही काहीही मिळणे वगैरे ) ते सर्व तेथील विचित्र जीवनशैलीमुळे निर्माण झालेले व नंतर कसे तरी सोडवलेले प्रॉब्लेम्स आहेत. उदाः रात्री अडीच वाजता भाजी मिळणे! अरे पण हवीय कुणाला ती पुण्यामधे! रात्री अडीच वाजता भाजीबाजार चालू असावा ही मुंबईकरांची गरज आहे.