ही फारच चांगली माहिती दिलीत. धन्यवाद! अल्बमचं नाव मात्र हिंदी इंग्रजी मिश्र नाव देण्याच्या नव्या पद्धतीतलं असल्यामुळे फ्युजन वगैरे आहे की काय अशी भीती वाटली.
कुमारजींची निर्गुणी भजनं आणि विशेषतः 'सुनता है गुरु ग्यानी... ' अक्षरशः तासनतास ऐकत राहावसं वाटतं. राहूल देशपांड्यांचं 'सुनता है गुरुग्यानी... ' इ-स्निप्सवरून मागे एकदा डाऊनलोड केलं होतं आणि ऐकलं होतं. तेही फारच सुंदर होतं. त्यामुळे हा नवा अल्बम घ्यायला आवडेल.