हा लेख फार वरवरचा वाटला. यात कुठेही संशोधनात्मकता जाणवलेली नाही. मग त्याला सर्वेक्षण कसे म्हणायचे? निदान प्रतिसादासाठी निवडलेल्या वाचकांची निवड कशी केली, त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले, सर्वेक्षणाची उद्दिष्टे काय होती, अग्रलेखाची वाचकांना उत्सुकता असते हे कशाच्या आधारे गृहित धरले, अग्रलेखाचे प्रकार ( राजकीय, वगैरे) पाडताना त्यासाठी पूर्वीच्या कोणा व्यक्तीच्या लेखनाचा आधार घेतला होता का, विषयाशी संबंधित माहिती कोणत्या संदर्भ साधनांच्या आधारे गोळा केली यापैकी कशाचाच उल्लेख नाही. निवडलेल्या वाचकांची २० ही संख्या विचारातही घेऊ नये इतकी कमी आहे. पण तरीही सुधारित स्वरूपात हाच विषय पुन्हा चर्चेला घेता येईल.