... आणि बऱ्यापैकी पटण्याजोगी.
आणखी सम्ऱूद्धी आली. दुचाकीच्या जागी चारचाकी आली. पुन्हा पुर्वाश्रमीच्या
दुचाकीवाल्यांची बहुसंख्या आणि त्याच सवयी. यथावकाश आलेले नवे गाडीवालेही
तोच कित्ता गिरवू लागले.
एकच सुधारणा (किंवा खरे तर भर): अचानक आलेल्या समृद्धीबरोबर काही प्रमाणात* येणाऱ्या उन्मत्तपणानेही यात थोडी भर घातली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*सर्वांनाच असे होत नाही, बहुतांशांना असे होत नसावे, पण तरीही असे होणारेही एकूण अचानक समृद्ध होणाऱ्यांच्या प्रमाणात टक्केवारीने खूपच कमी असले तरी निव्वळ संख्येने बरेच असावेत असे वाटते, म्हणून 'काही प्रमाणात'. सरसकट विधान करण्याचा हेतू नाही.
- (भूतपूर्व पुणेकर) टग्या.
('थियरी'ला मराठी प्रतिशब्द काय? )