मग सर्व बैलगाड्यात एक प्रकारची शर्यतच लागत असे
यावरून आठवलं (मनोगतावरच्यासारखं ! )
खूप मागे (कॉलेजात असताना) कार्ले भाजे सहलीला गेलो असताना कार्ल्याच्या लेण्यांपासून भाज्याच्या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी आम्ही बैलगाड्या 'केल्या' होत्या. एकेका गाडीत आठ आठ जण असून त्या गाड्यांची शर्यत लावली होती! नऊ जणांचे आणि गाडीचे वजन असूनही ते रस्त्याच्या काही भागात बैल चौखूर (अक्षरशः चौखूर) पळत ओडून नेत असलेले मी पहिल्यांदाच (आणि आतापर्यंत शेवटचेच) पाहिले.