ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य पूज्य बेलसरे बाबा अलिकडच्या काळातील एक थोर व्यक्तित्व होवून गेले। विज्ञानयुगातील साक्षर समाजाची सनातन तत्वज्ञानावरील (फिलॉसॉफिया पेरेनीज) निष्ठा डळमळीत होत असताना या महापुरुषाने काळानुरुप बदलणाऱ्या भाषेत आपल्या जीवनातील अध्यात्मविचाराचा प्रयोगसिद्ध आलेख लोकांसमोर मांडला आणि तो कुठलाही अभिनिवेष न बाळगता !
सिद्धार्थ कॉलेजमध्ये तत्वज्ञानासारखा रटाळ विषय बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला.
सॉक्रेटिस,प्लेटो अरिस्टॉटल पासून ते बर्ट्रॉन्ड रसेल, ब्रॅडले सारख्या नवमतवादी विचारवंतांच्या तत्वचिंतनाचा परामर्श घेताना ज्ञानेश्वरी आणि गाथेसारख्या सनातन तत्वज्ञानाचा विसर त्यांनी पडू दिला नाही. रसिक परंतु संयमी, भाविक पण भाबडेपण नाही, बुद्धीवादी परंतु दुराग्रही नाही, प्रेमळ असून असंग, आस्तिक पण नास्तिकमतांतरातील विचार साक्षेपीपणे अभ्यासणारा, तत्वचिंतक पण रुक्ष नाही...बेलसरे बाबांचे व्यक्तित्व असे बहुपेडी होते.
उत्तम काव्य, अभिजात संगीत आणि साहित्य यांचा रसिकवॄत्तीने आस्वाद घेत एक आनंदपूर्ण जीवन जगताना शाश्वताचा शोध घेणारा मुमुक्षू आणि त्यांची प्रयोगसिद्ध भूमिका मांडणारा बुद्धीवादी अशी बाबांची वैचारिक बैठक होती.
त्यांचे ...
पुढे वाचा. : ज्ञानेश्वरी- प्रा. के. वि. बेलसरे यांची निरुपणे.