हॅ!
गत पंधराएक दिवस अगदी हॅ म्हणजे हॅ गेले... निवडणूक वार्तापत्रांसारखे... पोकळ!
यास कारण आमची ही.
म्हणाली :
कशाला लिव्हता हो तुम्ही ते लेखबिख?.... आणि लिहायचं तं जरा चांगलं तरी लिहायचं! एरवी बरे, संपादकांचा लेखबिख छापून आल्यावर, वाचायच्या आधी एक्स्लंट आर्टिकल म्हणून एसेमेस करता! मग इथंच का तुमचा पेन असा आडव्यात शिरतो?... सारखं आपलं याला-त्याला नावं ठेवायची आणि याच्या-त्याच्या चुका शोधायच्या!... आता एक तरी पेपर ठेवलाय का तुम्ही बाकी? उद्या सकाळच्या नाय तं लोकसत्तेच्या दारी उभारायची वेळ आली, तर करतील का ते तुम्हांला रिसेप्शनपाशी तरी उभं?... दिवस कसे रिसेशनचे आहेत. पण यांना आहे का त्याचं काही??!
एवढी करदावली, एवढी करदावली, की त्या दिशी आम्ही शपथच खाल्ली रामारक्ताची, की बस्स, आजपासून ब्लॉगबिग बंद. लेखबिख बंद. पूर्ण ...
पुढे वाचा. : उपास सोडला!