वरील सर्व प्रतिसाद वाचून धक्का बसला आणि वाईट पण वाटले. मी गे आहे. अतिशय साध्या आणि सन्स्कारमय वातावरणात वाढलो आहे. MS, MBA अशी शैक्ष्णीक पार्श्वभुमी आहे. तुम्ही गे का होतात ह्यावर उहापोह करण्यापेक्शा त्यान्ना समाजात आदराची वागणुक कशी मिळेल ह्यावर चर्चा व्हायला हवी. गे असणे किव्वा straight असणे हे कोणीच स्वताहून पसंद करत नाहि. मला वयाच्या १३ व्या वर्षापासून कळायला लागले की आपण इतरांपेक्शा वेगळे आहोत ते. तेव्हा गे काय हे काहिही कळत नव्हते. शब्द माहित नव्हते पण भावना माहीत होत्या. पुढे उच्च शिक्शण घेऊन अमेरिकेला आल्यावर आणि स्वताच्या पायावर उभे राहिल्यावर आई-वडिल, बहिण, मित्र ह्याना सान्गितले. पहिल्यांदा सगळ्याना धक्का बसला, पण हळुहळू जास्तित जास्त ह्या विषयावर बोलून आणि आपल्याच khajuraho temples, upanishadas, ह्यांची उदाहरणे सगळ्याना दाखवल्यावर ही reality आहे ह्यावर लोकांचा विश्वास बसला. गे हि कल्पना आपल्याकडे नवीन नाहि, पण इंग्र्जांच्या १५० वर्षाच्या कारकीर्दी मूळे आपण आपले खरे भारतियत्व विसरलो आहे. मी स्वतः देवपुजा करणे, सण साजरे करणे ह्या सगळ्या गोष्टी करतो. मी हे सगळे ह्यासाठी सांगत आहे जेणे करून तुम्हाला कळेल कि गे लोक हे पण तुमच्या-माझ्या सारखे असतात. गेले ६ वर्षे मी आणि माझा partner (तो पण महाराष्त्र्ट्रीयन आहे) एकत्र राहत आहोत. किराणा आणणे ,कार खरेदि, घराचे लोन, आई-वडिलांच्या तब्येति, करीअर मध्ये पुढे जाणे, हिंदी चित्रपट पाहणे - ह्या आणि अशा इतर गोष्टी जशा तुम्हाला matter करतात, तशाच आम्हाला पण matter करतात. मला असे वाटते कि आपण स्वताला ह्या बाबतीतले नीट न्यान घेउन मगच विधाने करणे चांगले आहे. कारण आपण ज्या लोकांबद्दल बोलत आहोत, ते त्यांचे आयुष्य आहे आणि जोपर्यंत आपल्याला अशी लोक माहीती नसतील तोपर्यंत उगिचच नित्कर्श काढणे चुकिचे आहे.
मला मराठित टाईप करायची आजिबात सवय नाहिये, त्यामुळे चुका झाल्या असतिल तर माफ करा. तसेच काहीही शंका असतील तर मला नक्की विचारा. अशा बोलण्यातुनच आपले भावविश्व सम्रुध होते.