हा किस्सा माझ्या आई-बाबांच्या लग्नाच्या वेळचा आहे. लग्नाला गुरुजी म्हणून एक २० वर्षाचा तरूण आला होता. माझ्या बाबांपेक्षा ही वयाने लहानच होता. (बाबा त्या वेळी २८ वर्षांचे होते). पण तो गुरुजी आहे म्हणून बाबांनी त्याला चक्क "अहो आजोबा" अशी हाक मारली. त्या तरुणाचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता म्हणे!! आजही हा किस्सा आठवून आई-बाबा हसून हसून बेजार होतात.